नांदेड,(प्रतिनिधी)- २९ मार्च २०२१ रोजी नांदेडमध्ये झालेल्या घटनेत एका गुन्ह्यातील एका आरोपीला ९ महिन्यानंतर सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी पहिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
२९ मार्च रोजी नांदेडमध्ये घडलेल्या घटनेत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते.त्यातील एका गुन्ह्याचा क्रमांक ११५/२०२१ असा होता.तेव्हाच्या तीन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.गुन्हा क्रमांक ११५ मध्ये आरोपी सदरात जसप्रीतसिंघ उर्फ सिंटू ढेरी देवेंद्रसिंघ बावडीवाले या युवकाचे नाव होते.जसप्रीतसिंघ बावडीवालेच्या वतीने ऍड.रमेश परळकर आणि ऍड.अमनपालसिंघ कामठेकर यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्या.के.एन.गौतम यांनी बावडीवालेला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.९ महिन्यानंतर पहिल्यांदा २९ मार्चच्या घटनेतील आरोपीना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.