सामाजिक कार्यकर्ते सरदार गुरूसेवकसिंघ यांचे नांदेड विमानतळवर जोरदार स्वागत ; एअर इंडियाच्या विमानाने आगमन

नांदेड(प्रतिनिधी)- अमृतसर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सरदार गुरूसेवकसिंघ यांचे काल नांदेड एअर इंडिया च्या विमानाने नांदेड येथिल श्री गुरू गोबिंद सिंघ जी विमानतळवर आगमन झाले असून नानक साई फाऊंडेशन तर्फे त्यांचे जोरदार स्वागत झाले.

नवीन वर्षाच्या स्वागताला दरवर्षी हुजूर साहिब येथे नियमित हजेरी लावून माथा टेकण्यासाठी अमृतसर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सरदार गुरूसेवकसिंघ येत असतात. नानक साई फाऊंडेशन या चळवळीत त्यांचा मोठा सहभाग असतो. संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेली घुमान यात्रा अमृतसर ला पोहचल्यानंतर यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात त्यांचा पुढाकार असतो.. बुधवार रोजी गुरूसेवकसिंघ आणि त्यांच्या जथ्याचे नांदेड येथे एअर इंडिया कंपनीच्या विमानाने आगमन झाले,यावेळी त्यांचे जोरदार असे स्वागत करण्यात आले. नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, घुमान चळवळी तील सारथी डॉ मनीष वडजे, प्रकाश अजमेरा, सुधाकर पिलगुंडे, सुनील देशमुख,धनंजय उमरीकर, पुंडलिक वेलकर,श्रेयस बोकारे, सरदार लाली संगरूर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान संगरूर हलक्याचे आमदार सरदार इकबाल सिंघ यांचे पण काल आगमन झाले, त्यांचे पण टीम नानक साई च्या वतीने स्वागत करण्यात आले.

नवीन वर्षाच्या निमित्ताने पंजाब हुन मोठया संख्येने भाविक नांदेड येथे दाखल झाले आहेत. त्यांच्या निवास आणि इतर सर्व सोयी साठी सचखंड गुरुद्वारा कमिटी आणि लंगर साहिब गुरुद्वारा ची संत मंडळी सेवा उपलब्ध करून देत आहेत. यात्रेकरूंना शुभेच्छा देत आहेत. संत बाबा नरेंद्र सिंघ जी आणि संत बाबा बलविंदरसिंघ जी स्वतः लक्ष देऊन आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *