नाळेश्‍वर-सुगाव-हस्‍सापुर-नांदेड रस्त्यावर वाहतुकीस 29 एप्रिल पर्यंत प्रतिबंध- डॉ. विपीन

नांदेड (प्रतिनिधी) – राज्‍य मार्ग 61 नाळेश्‍वर – हस्‍सापुर -नांदेड रस्‍त्‍यावरील प्रमुख जिल्‍हा मार्ग- 84 किमी 0/400 येथील काम सुरु करण्यात येणार आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्‍या वाहतुकीस दि. 29 एप्रिल 2022 पर्यंत प्रतिबंध केला आहे. या रस्त्यावरील वाहनास पर्यायी मार्ग म्हणून जड वाहनांसाठी पश्चिम वळन रस्‍ता श्री खंडेराव होळकर चौक येथून असर्जन मार्गे नांदेड व नाळेश्‍वर कडे ये-जा करतील. तर दुचाकी, हलके वाहनांसाठी ग्रामीण मार्ग-70  वरुन नोबेल कॉलनी मार्गे नांदेड व नाळेश्‍वरकडे ये-जा करतील. मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी याबाबत अधिसूचना निर्गमीत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *