पर्यायी रस्ता बदला अन्यथा स्ट्रीट लाईट चालू करून व पेट्रोलिंग वाढवा- नवनाथ काकडे

नांदेड,(प्रतिनिधी)- राज्यमार्ग 61 चे नवीन काम सुरु होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने पर्यायी मार्ग जनतेसाठी सुचवला आहे.पण तो पर्यायी मार्ग भयंकर त्रासाचा असल्याने त्यावर पोलीस गस्त वाढवावी आणि स्ट्रीट लाईट बसवावे असे निवेदन शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे यांनी प्रशासनानला दिले आहे.
                     राज्यमार्ग 61 नाळेश्वर सुगाव, हस्सापुर नांदेड रस्त्यावरील प्रमुख जिल्हा मार्ग 84 किमी 0/400 येथील काम सुरू करण्यात येणार आहे.असे वृत्तपत्रात प्रसारित झालेले आहे दिनांक 29 एप्रिल 2022 पर्यंत या रस्त्यावरून जाणाऱ्या ये-जा करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून हस्सापुर येथील पश्चिम म्हणून रस्त्यावर  असलेल्या राजे खंडेराव होळकर चौक ते असर्जन मार्ग दिलेला आहे.सदर या मार्गावरील मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात लूटमार खुनाच्या घटना घडत आहेत आणि घडलेल्या ही आहेत त्यामुळे पश्चिम वरून रस्त्यावरती राजे खंडेराव होळकर चौक येथे पोलीस चौकी येथील पोलीस कर्मचारी जास्त तैनात करावे व सदर रस्त्यावरील पोलीस चौकी ते गोदावरी नदी, असर्जन मार्गावरील पेट्रोलिंग वाढविणे तसेच स्ट्रीट लाईट तात्काळ चालू करण्यात यावे असे शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे यांनी निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले आहे सदर रस्त्यावरून हस्सापुर ,सुगाव, थुगाव ,बोरगाव ,कोरका पिंपळगाव, कोटितीर्थ, बोरगाव,वाघी, राहाटी ,नाळेश्वर सोमेश्वर ,जैतापूर , ढोकी, कावलगाव, अशा अनेक गावातील नागरिक नांदेड शहरांमध्ये मोलमजुरी करण्यासाठी, विद्यार्थी  शाळा शिकण्यासाठी ,कॉलेज ट्युशन साठी, सायकल वर मोटर सायकल वर आणि आयटो द्वारा ये-जा करत असतात. या सर्व गावातील नागरिकांनी अनेकदा लुटमारीच्या घटना पाहिल्या आणि अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना हा पर्याय रस्ता कठीण वाटायला लागलेला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. 
                        सदर रस्त्यावरील स्ट्रीट लाईट चालू करण्यात यावे व पोलीस गस्त वाढवून पेट्रोलिंग करण्याचे अत्यंत आवश्यकता आहे अन्यथा दररोज किती घटना घडण्याची दाट शक्यता आहे. तेरी मेहरबानी लवकरात लवकर रस्त्यावर स्ट्रीट लाईट चालू करून पोलिस गस्त वाढवून पेट्रोलिंग करण्यात यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *