नांदेड(प्रतिनिधी)-1661 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस या शब्दाची पहिली नोंद झाल्यानंतर पोर्तुगिजांनी ती पहिली पोलीस चौकी स्थापन केली होती. 1672 मध्ये पुढे सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज तयार झाली. हीच फौज पुढे महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम करणारी ठरली. दि.2 जानेवारी पासून महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेला 61 वर्ष पुर्ण होत आहेत. यानिमित्त नांदेड जिल्हा पोलीसांनी कोरोना आणि ओमीक्रॉन या विषाणुंच्या संदर्भाने जनजागृती करत हा पोलीस स्थापना दिवस, सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.
1661 ते सन 2021 दरम्यान अनेक बदल झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला 2 जानेवारी 1961 रोजी अधिकृत स्थापना करण्यात आली. त्या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र पोलीस ध्वज तत्कालीन आयपीएस अधिकारी सुब्रमण्यम यांना स्वाधीन केला होता. हा ध्वज महाराष्ट्रातील पहिले कला शाखेतील अधिष्ठाता व्ही.ए.आराडकर यांनी बनवला होता. आज राज्यात 10 पोलीस आयुक्तालय, 36 जिल्हा पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे एकूण मनुष्यबळ 1 लाख 80 हजार आहे. त्यामध्ये 6 टक्के आणि आणि 94 टक्के पोलीस अंमलदार आहेत.
2 जानेवारी ते 8 जानेवारी पोलीस स्थापना दिवस साजरा करण्याची प्रथा माजी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी आणली होती. तेंव्हापासून दरवर्षी हा पोलीस स्थापना दिवस साजरा होतो. यंदाच्या पोलीस स्थापना दिवसात 2 ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृहपोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात 2 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयामधील सर्व शाखांमधील मंत्रालयीन कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना कोविड योग्य वर्तवणूक या विषयात मास्क वापरणे, दोन गज अंतर ठेवणे हात साबनाने धुणे, कोणालाही स्पर्श न करता अभिवादन करणे या बद्दल मार्गदर्शन होणार आहे. 3 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरीकांची बैठक घेवून त्यांच्या समस्या सोडविल्या जातील. 4 जानेवारी रोजी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शाळा, महाविद्यालयांमध्ये ओमीक्रॉन विषाणुबाबत जनजागृती करण्यात येईल. 5 जानेवारी रोजी जनजागृती होईल. 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या अनुषंगाने पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात येईल. 7 जानेवारी रोजी कोविड काळात योग्य वर्तवणूक या बद्दल मार्गदर्शन होईल. 8 जानेवारी रोजी पोलीस ठाण्यातील कामकाज आणि शस्त्रांबद्दलची माहिती जनतेला आणि विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
2 ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेजिंग डे निमित्त अनेक कार्यक्रम