नांदेड(प्रतिनिधी)-एका सिमेंट ट्रक चालकाने 27 टन सिमेंट गायब केले आहे. या बद्दल भोकर पोलीसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सय्यद शहाबाज उल्लाह हक, शहा अन्वर उल्ला हक सय्यद रा.अदिलाबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबर रोजी रात्री 11 ते 28 डिसेंबरच्या पहाटे 10 वाजेदरम्यान त्यांनी 26 टन सिमेंट प्रत्येक बॅगची किंमत 391 रुपये असा एकूण 2 लाख 3 हजार 523 रुपयांचा सिमेंट साठा ट्रक क्रमांक टी.एस.01 यु.सी.0914 मध्ये भरून वैभव ट्रेडर्स औंढा नागनाथ जि.हिंगोली येथे पाठविला. परंतू त्या ट्रकने तो सिमेंट साठा औंढा नागनाथ येथे सोडलाच नाही. ट्रक चालक निसार खान उस्मान खान पठाण, शेख मोईन, गोविंद पाटील रा.भोकर या तिघांनी मिळून या सिमेंट साठ्याची विल्हेवाट लावली आहे. भोकर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 479/2021 कलम 381, 411, 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला असून पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक अनिल कांबळे या घटनेचा तपास करीत आहेत.
27 टन सिमेंट गायब करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल