नांदेड जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकारी आणि सात पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस सेवेतील तुमचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे जीवनाला पुर्ण विराम लागला नाही. उद्यापासून नवीन जीवनाची नवीन सुरुवात करण्याची ही संधी आहे. अशा शब्दात अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या 3 अधिकारी आणि 7 पोलीस अंमलदारांना जीवनातील कोणत्याही संकटात पुर्ण नांदेड जिल्हा पोलीस दल तुमच्या सोबत आहे. अशा शुभकामना दिल्या.
आज नांदेड जिल्हा पोलीस दलातून सहाय्यक पोलीस निरिक्षक सुभान कोंडीबा केंद्रे (आर्थिक गुन्हे शाखा), पोलीस उपनिरिक्षक दिलीप निवृत्ती वाघमारे(विमानतळ), शेख अताउर रहेमान शेख अब्दुल रहेमान (मनपा, नांदेड), पोलीस अंमलदार रघु त्र्यंबक सुरनर, बालाजी दत्तात्रय शिंदे, अनंत रानोजी पवार (पोलीस ठाणे लोहा), केशव योगाजी राठोड, मारोती कोंडीबा सूर्यवंशी (पोलीस मुख्यालय), विष्णु गंगाधर बाबर(पोलीस ठाणे इतवारा) आणि मारोती लक्ष्मा पेदौर (पोलीस ठाणे सिंदखेड) असे दहा जण आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.
या प्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सह कुटूंब सन्मान केला. या प्रसंगी पुढे बोलतांना निलेश मोरे म्हणाले. आजपर्यंत साहेब काय सांगेल, आपले मातहत कर्मचारी ऐकणारी नाहीत, वेळेत काम पुर्ण झाले नाही तर त्रास होतो अशा अनंत समस्यांना विचार करत आज पोलीस दलात आपली सेवा आपण पुर्ण केली आहे. उद्यापासून साहेब काय म्हणेल, माताहत ऐकणारी नाहीत. हा त्रास संपला आहे. तुमच्या जीवनातील एका अध्यायाला आज पुर्ण विराम लागला आहे. तरीपण येथे सर्व कांही संपलेले नाही. यापुढील जीवन अत्यंत दमदारपणे जगण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्यावतीने मी आपल्याला शुभकामना देत आहे.
याप्रसंगी पोलीस अंमलदार विठ्ठल कत्ते यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, महिला पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी परिश्रम घेतले.
