न्यू इअर पार्टीत आपल्या मित्राचा खून करणारे चार गजाआड

नांदेड,(प्रतिनिधी)- मित्राला मारहाण करून गच्चीवरून फेकून देणाऱ्या चार जणांना भाग्यनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. नवीन वर्षाची न्यू इअर पार्टी मध्ये झालेल्या वादातून हा खून करण्यात आला आहे.
                  श्वेता संतोष भालेराव वय 30 वर्ष व्यवसाय घरकाम राहणार गोदावरी नगर नांदेड हिने पोस्टेला हजर होऊन फिर्याद दिली की दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी ते मध्यरात्रीच्या  सुमारास सिद्धिविनायक नगर फ्लॅट नंबर 14 बी आर जे प्लाझा इमारत मालेगाव रोड नांदेड येथे तिचा पती संतोष वामनराव भालेराव वय 30 वर्ष व्यवसाय ऑटो चालक राहणार गोदावरी नगर नांदेड. यास त्याचेच मित्र  गणेश व्यंकटराव कदम  (29) माधव ज्ञानोबा बोलके (30), सोपान बालाजीराव नेव्हल पाटील (29) आणि  मारुती नवाजी बोलपेवाड (30) यांनी संगणमत करून आपसात घाण व गचाळ शिवीगाळ केली.नंतर त्यांनी दारू पिण्यासाठी सोबती असणारा आपलाच मित्र संतोष वामनराव भालेराव यास आगोदर  हातातील लोखंडी कड्या ने मारहाण करून जीवे मारण्याच्या हेतूने इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या गॅलरी मधून ढकलून देऊन खुन केला आहे.
                  घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी  गणेश व्यंकटराव कदम  (29) माधव ज्ञानोबा बोलके (30), सोपान बालाजीराव नेव्हल पाटील (29) आणि  मारुती नवाजी बोलपेवाड (30) या चार मारेकऱ्यांना गजाआड केले आहे. श्वेता तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 3/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302,504,34 नुसार दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक सुनील भिसे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *