राज्यातील पोलीस अंमलदारांना आंतर जिल्हा बदलीसाठी महासंचालक संजय पांडे यांनी दिली ऑनलाईन सुविधा 

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस अंमलदारांसाठी केलेल्या असंख्य कामांमध्ये एका नवीन कामाची भर पडली आहे. त्यात अंतर जिल्हा बदली मागणीसाठी येणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या अर्जासंदर्भाने ऑनलाईन पोर्टल बनविले आहे. त्यामुळे अंतर जिल्हा बदली मागणाऱ्या पोलीस अंमलदारांसाठी ही मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. 
                             पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर दिलेल्या माहितीनुसार अंतर जिल्हा बदली करण्यासाठी पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक असे अनेक अंमलदार अर्ज करतात. त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांची मागणी पुर्ण करता यावी म्हणून महा पोलीस या संकेतस्थळावर एक नवीन पोर्टल बनविण्यात आले आहे. त्याची लिंक http://onlinerequest.mahapolice.gov.in/  आहे. सोबतच पोलीस अंमलदारांना हा ऑनलाईन अर्ज भरतांना कांही अडचणी आल्या तर त्या अडचणी दुर करण्यासाठी टेलीग्रॅम चॅनल बनविण्यात आले आहे. ज्यांना अंतर जिल्हा बदली हवी अशी मंडळी या टेलीग्रॅम चॅनलवर आपल्या अडचणी मांडू शकतील. टेलीग्रॅम चॅनलची लिंक  http://t.me/+w9WpwiBwSrY1ZDU1 आहे. 
                        पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या पोलीस अंमलदारांसाठी तयार केलेल्या या नवीन सुविधेने अंतर जिल्हा बदलीसाठी नवनवीन त्रास घेवून आपल्या अडचणी मांडतांना ज्या पोलीस अंमलदारांच्या नाकी नऊ आले त्यांच्यासाठी ही ऑनलाईन सुविधा वरदान ठरणारी आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *