नांदेड(प्रतिनिधी)-एका 20 वर्षीय युवतीवर तिला पळवून देऊन तिच्यावर गॅंग रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवतीने भोकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण घटनास्थळ हे पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा आता भाग्यनगरमध्ये दाखल होत आहे.
एका 20 वर्षीय युवतीने भोकर पोलीस ठाण्यात दिल्या तक्रारीनुसार 28 डिसेंबर रोजी तिला भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तिला पळवून नेण्यात आले होते त्याप्रकरणी युवतीच्या वडीलांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात मिसिंग प्रकार दाखल केला होता. 1 जानेवारीच्या रात्री या युवतीने पोलीस ठाणे भोकर येथे दिलेल्या तक्रारीनुसार तिला दि.28 डिसेंबर रोजी सकाळी एका महाविद्यालयासमोरून लक्ष्मण रुखमाजी कटकमवाड (22), विजय रुखमाजी कटकमवाड आणि इतर एक रा.आंदेगाव ता.हिमायतनगर यांनी उचलून नेले. त्यावेळी तुझ्या अत्याच्या घरी जायचे आहे. असे सांगून तिला नांदेड-पनवेल गाडीने घेवून गेले. मुंबई येथील एका उपनगरात तिच्यावर हा गॅंगरेपचा प्रकार घडला आहे. हा सर्व घटनाक्रम भोकर पोलीसांनी नोंदवून घेतला. त्यावेळी पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक राणी भोंडवे यांनी हा गुन्हा दाखल केला. सोबतच या गुन्ह्याचे सुरूवातीचे क्षेत्र भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्या युवतीच्या मिसींग बद्दलची तक्रार दाखल आहे. म्हणून हा गुन्हा भाग्यनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आज दि.2 जानेवारी रोजी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे या युवतीवर झालेल्या गॅंगरेप प्रकरणाचा गुन्हा आला आहे अशी माहिती भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी दिली. वृत्तलिहिपर्यंतच्या काळात या गुन्ह्याची नोंद भाग्यनगर येथे झाली नव्हती.
नांदेड येथून उचलून नेऊन मुंबईच्या उपनगरात 20 वर्षीय युवतीवर गॅंगरेप