नांदेड,(प्रतिनिधी)- ओमप्रकाश पोकर्णा यांनी आडत्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने आडत्यांनी निषेध म्हणून नवा मोंढा मार्केट बंद केले.
आज सोमवारी खरेदीदार उशिरा पेमेंट देत असल्याने आज बीट व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.त्या पार्श्वभूमीवर आज सभापती संभाजी पुयड उपसभापती पंजाबराव आढाव माजी सभापती बी आर कदम संचालक आनंदराव कपाटे संजय लोणे सचिव पवार यांनी आडते व खरेदीदार यांची मार्केट कमिटीच्या सभागृहात बैठक बोलावली होती.
मार्केट कमिटी पदाधिकारी यांनी चांगली भूमिका घेत मध्यस्थी केली. बैठकीत दोन्ही बाजूंनी सविस्तर चर्चा झाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी यांनी तोडगा काढत आठ ते दहा दिवसांत एक रुपया काटुन व वीस दिवसांत काही न काटता पेमेंट द्यावे असे सांगितले.
पदाधिकारी यांचा निर्णय आडत्यांनी एकमुखाने मान्य करून त्यांचा हा निर्णय खरेदीदारांना मान्य आहे का अशी विचारणा केली असता काही बाबतीत त्यांनी तयारी दर्शवून सर्वांशी चर्चा करतो म्हणून सांगितले व सदर बैठक संपून काही मंडळी सभागृहाच्या बाहेर गेली.
तेव्हढ्यात व्यापारी प्रतिनिधी ओमप्रकाश पोकर्णा हे आले व येतानाच त्यांनी सर्व आडत्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत प्रवेश केला व काही जणांच्या अंगावर धावून जात अरेरावी केली त्यामुळे वातावरण चिघळले.
त्यानंतर पोकर्णा यांचा अरेरावी व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्या मुळे आडत्यांनी सर्व मार्केट तातडीने बंद करून निषेध व्यक्त केला आहे.
मार्केट कमिटीच्या पदाधिकार्यांनी संयमी भूमिका घेऊन प्रकरण चांगले हाताळणे असताना व्यापारी प्रतिनिधी पोकर्णा यांनी दुधात मिठाचा मिठाचा खडा टाकून पूर्ण परिस्थिती बिघडवली.
ज्येष्ठ आडते मधुकरराव देशमुख, प्रल्हादराव खांडेकर,प्रल्हाद इंगोले विठ्ठल देशमुख, बालाजी पाटील भायेगावकर, नवनाथ दर्यापूरकर, दीपु मुरक्या, नागठाणे, भराडिया, संतोष मुळे ,जिंके ,राम राजेगोरे यांच्यासह आडते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरेदीदाराच्यावतीने बद्रीनारायण मंत्री, विजय गोयंका कैलास काबरा, साई मुंदडा ,आनंद धुत, गोविंद काकाणी यांच्यासह खरेदीदार उपस्थित होते .बीट झाल्यावर चोवीस तासांत शेतकर्यांना पैसे द्यावे असा शासनाचा नियम आहे.परंतु तडजोड म्हणून दहा ते वीस दिवसांत पेमेंट घेण्याची आडत्यांनी तयारी
दर्शवली.प्रत्यक्षात खरेदीदार दोन महिन्यांच्या नंतरच आडत्यांना पैसे देतात त्यामुळे आडतेही शेतकऱ्यांना दोन महिन्यां नंतरही पैसे देतात,असेही सांगण्यात आले.
