मधुकरराव वाघमारे यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या ‘सिडको’ परिसरातील ‘राहूल’नगर, वाघाळा येथील रहिवासी तथा आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी मधुकरराव तुकाराम वाघमारे – निळेकर (वय-७० वर्षे) यांचे तीन जानेवारी रोजी पहाटे निधन झाले.

दिवंगत मधुकरराव वाघमारे निळेकर यांच्या पार्थिव देहावर ३ जानेवारी रोजी सायंकाळी नवीन नांदेडातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांबळे यांचे ‘ते’ सासरे व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते संजय निळेकर यांचे ‘ते’ वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *