नांदेड,(प्रतिनिधी)- तामसा जवळील मौजे लिंगपूर येथे दोन घरे,एक बुद्ध विहार अश्या तीन जागी चोरटयांनी हाथ साफ केला आहे. या तीन घटनांमध्ये एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १५ हजारांचे दोन मोबाईल चोरीला गेला आहे. तसेच देगलूर आणि शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक एक अश्या ५० हजारांच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.या सर्व चोरी प्रकारांमध्ये १ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
संजय लकडोजी लोकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २ जानेवारीच्या रात्री १० ते ११.३० वाजेदरम्यान त्यांच्या घरातून,शेजारी पार्वतीबाई संभाजी देवसरकर यांच्या घरातून आणि मौजे लिंगापुर ता.हदगाव येथील बौद्ध विहारातून सोने चांदी आणि रोख रक्कम,ध्वनी क्षेपकाचे साहित्य असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.तामसा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस अंमलदार राठोड हे करीत आहेत.
लक्ष्मण पाराजी हिवरे यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल ३१ डिसेंबर ते १ जानेवारीच्या रात्री त्यांच्या घरातून,सिद्धनाथपुरी येथून १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरीला गेले आहेत.इतवारा पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस अंमलदार निरडे हे करीत आहेत.
शेख अलीम शेख सरवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २ ते ३ जानेवारीच्या रात्री त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एमएच २६ वाय ३९८१ हि १० हजार रुपये किमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.देगलूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस अंमलदार मिरदोडे हे करीत आहेत.
विजय किशनराव होटकर यांची दुचाकी क्रमांक एमएच २६ एइ ९३२७ ही ४० हजार रुपये किमतीची गाडी ३१ डिसेंबर रोजी आफ्टर सेवन बार समोरून चोरीला गेली आहे.शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस अंमलदार शेख इब्राहिम हे करीत आहेत.