नांदेड(प्रतिनिधी)-एका 23 वर्षीय महिलेने आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार पाटोदा ता.धर्माबाद येथे घडला आहे. धर्माबाद पोलीसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
इरवंत संभाजी इळेगाव यांनी दिलेल्या खबरीनुसार पाटोदा (बु) ता.धर्माबाद येथे महादेवी लक्ष्मण मोताचे (23) या महिलेने आपल्या घरातील लाकडी तुळईला साडीने गळफास घेवून दि.8 जूनच्या दुपारी 2 वाजेच्यासुमारास आत्महत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरिक्षक सोहन माच्छरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून आकस्मात मृत्यू क्रमांक 15/2021 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद कत्ते अधिक तपास करीत आहेत.
23 वर्षीय महिलेची आत्महत्या; धर्माबाद येथील घटना