नांदेड(प्रतिनिधी)- सहकार अधिकारी देविदासराव कवडे मुंबई (बोरिवली) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज नांदेड येथे प्रदान करण्यात आला..
महात्मा कबीर समता परिषदेचे अध्यक्ष डॉ मुकुंद पाटील आणि नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन पंढरीनाथ बोकारे (जेष्ठ पत्रकार) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.. हा कार्यक्रम लंगर साहिब गुरुद्वारा च्या बाबा बुड्डा जी नरी यात्री निवास परिसरात झाला.. सहकार उपसचिव देविदासराव कवडे यांच्या सामजिक कार्याची दखल महात्मा कबीर समता परिषदेणे घेऊन त्यांचा गौरव केला.