नांदेड(प्रतिनिधी)-खानापूर ता.देगलूर येथे एका महिलेला हात पाय बांधून लाकडाने मारहाण करून तिचे सोन्यचे दागिणे लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. सोबतच त्या महिलेच्या घराजवळच दुसऱ्या महिलेला पण लुटण्यात आले आहे.
व्यंकट तुकाराम कैकाडी यांचे घर इब्राहिमपुर रोड हनुमान मंदिराच्या पाठीमागे खानपूर ता.देगलूर येथे आहे. 6 जानेवारीच्या रात्री 1 ते 2 वाजेच्यासुमारास त्यांच्या आजीच्या घरी चोरट्यांनी घसून त्यांच्या आजीचे हातपाय बांधले. त्यांनी आरडाओरड केली तेंव्हा त्यांना लाकडाने मारहाण केली आणि त्यांच्या कानातील पाच ग्रॅम सोन्याच्या काड्या, 20 हजार रुपये किंमतीच्या, गळ्यातील सोन्याचे दोन ग्रॅमचे मनीमंगळसूत्र, 8 हजार रुपये किंमतीचे, एक ग्रॅम सोन्याची नथ 4 हजार रुपयांची आणि पायातील चांदीचे वाळे दहा हजार रुपयांचे तसेच हातातील चांदीचे दहा तोळ्याचे गोट, 5 हजार रुपये किंमतीचे असा 67 हजार रुपयांचा ऐवज लुटून बळजबरीने चोरून नेला. तसेच आजीच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणाऱ्या निर्मलाबाई एकनाथ ढगे यांच्या गळ्यातील 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनीमंगळसूत्र 12 हजार रुपयांचे असा दोन्ही जागी मिळून 79 हजार रुपयांचा ऐवज या चोरट्याने बळजबरी चोरून नेला आहे. हा चोरटा एम.एच.26 बी.बी.5570 या दुचाकीवर पळून गेला आहे. त्याचे नाव गाव मात्र माहित नाहीत.
देगलूर पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 8/2022 कलम 452, 394 आणि 392 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे करीत आहेत.