महाविर चौकात एक झाड पडल्याने रस्ता बंद
नांदेड(प्रतिनिधी)-रात्री पडलेल्या पावसाने शहरातील महाविर चौकात एक जुने झाड उल्मडून पडले आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत हा रस्ता बंद झाला होता.
काल दि.9 जूनच्या मध्यरात्रीनंतर अडीच वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या या हजेरीत महाविर चौकाच्या समोर एक जुने लिंबाचे झाड कोलमडून पडले. त्यामुळे बऱ्याच वीज वितरण वाहिन्या सुध्दा झाडात अडकल्या. त्यामुळे महाविर चौक ते मोंढाकडे जाणारा हा रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला होता. सकाळी 10 वाजेपर्यंत प्रशासनातील कोणतेही व्यक्ती झाड पडलेल्या ठिकाणी आले नव्हते. या पावसाने शहरात इतर ठिकाणी काय केले याची माहिती प्राप्त झाली नाही.
महाविर चौकात एक झाड पडल्याने रस्ता बंद