नांदेड,(प्रतिनिधी)- आज रविवारी कोरोना विषाणूने कहर करीत एकूण १४७ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४०९ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९६.६३ झाली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ९ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज १४७ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-०७, खाजगी रुग्णालय- ०१,जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल-०२, अश्या रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७९१७ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९६.६३ टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-८२, मुदखेड-०३, कंधार-०६, नांदेड ग्रामीण-०६, किनवट-०५, धर्माबाद-०१, नायगाव-०२, अर्धापूर-०४, लोहा-०५, हिंगोली-०१, मुखेड -०३, बिलोली-०६,माहूर-०५,भोकर-०१दे गलूर-०५,हदगाव-०१, परभणी-०६, पुसद -०१,उस्मानाबाद-०१,आदिलाबाद-०१, लातूर-०१, असे आहेत.
आज १३६३ अहवालांमध्ये ११६० निगेटिव्ह आणि १४७ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०९८१ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ११२ आणि २५ अँटीजेन तपासणीत असे एकूण १४७ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ४५ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ११ आहेत.
आज कोरोनाचे २७२ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -३०९, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-६७,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-२२, खाजगी रुग्णालयात- १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०१ असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०४ रुग्ण आहेत.