नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील पोलीस अंमलदारांसाठी अत्यंत आनंद देणारी बातमी आपल्या फेसबुक वॉलवर प्रसारीत केली. त्यानुसार पुर्वीप्रमाणे राज्यातील सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांच्यावतीने दिले जाणारे कर्ज पुन्हा एकदा मिळणार आहे. आपल्या पोलीस अंमलदारांसाठी ऐवढी मेहनत घेणाऱ्या पोलीस महासंचालकांच्याविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. हेच या भारतातील प्रगल्भ लोकशाहीचे दर्शन आहे.

पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी संजय पांडे यांच्या बाबत आज महाराष्ट्र पोलीस दलात आमचा देव अशी गणणा झाली आहे. राज्यात 70 टक्के पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या व्हॉटसऍप क्रमांकावर संजय पांडे यांचे छायाचित्र जोडलेले आहे. यावरुन त्यांच्याबाबत राज्यातील पोलीस दलात काय प्रतिमा असेल हे दिसते. पोलीस अंमलदारांसाठी अंतर जिल्हा बदलीचा विषय असेल, त्यांच्या वैद्यकीय बिलांचा विषय असेल, कोविड परिस्थितीत त्यांच्यासाठी काय आवश्यक आहे हा विषय असेल. अंमलदारांच्या कौटुंबिक अडचणींना कसे सोडवावे हा विषय असेल अशा प्रकारे एकंदरीत पोलीसांच्या जीवनाशी संबंधीत प्रत्येक विषयावर त्यांनी नेहमीच पुढाकार घेवून ते विषय अत्यंत सहजपणे कसे हाताळले जातील यावरच भर दिला.
दि.11 जानेवारी रोजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर माहिती प्रसारीत केली की, पोलीस अंमलदारांना पुर्वी मिळणाऱ्या पोलीस महासंचालक कर्जाबाबत पुढे काही अडचणी निर्माण झाल्या. त्यातील वैधता बदलली. अशा परिस्थितीत हे कर्ज पोलीस अंमलदारांना मिळणे बंद झाले होते. या संदर्भाने संजय पांडे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांशी बैठक घेवून हा विषय गृहमंत्र्यांच्या समोर मांडला आणि गृहमंत्र्यांनी या विषयाला 7 जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे. त्यानुसार पुढील आर्थिक वर्षात याची तरतूर होणार आहे. अर्थात 1 एप्रिल 2022 पासून पोलीसांना पोलीस महासंचालक कर्ज जुन्या पध्दतीप्रमाणे दिले जाणार आहे. कांही बाबी होत असतांना वेळ लागतोच तेंव्हा तुम्ही वाट पाहा ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे असा उल्लेख पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.
पोलीसांविषयी छोट्याशा घटनेकडे लक्ष देवून ते काम शेवटपर्यंत पोहचविण्याची मानसिकता असणाऱ्या पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे राज्यभरातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार धन्यवाद व्यक्त करत आहेत. कांही पोलीसांनी तर पोलीस महासंचालक कर्ज मिळणारच नाही म्हणून कांही वर्षांपासून तो अर्ज करणेच बंद केले होते. पण आता पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे ते कर्ज मिळणार आहे याबाबत राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना माहिती व्हावी म्हणूनच आम्ही हा शब्द प्रपंच तयार केला आहे. पोलीसांसाठी नक्कीच ही आनंददायी बातमी आहे.