पंचायत समितीचे गोडाऊन फोडून शेगड्या चोरल्या

मौजे सावळी ता.बिलोली येथे मंदिरात विटंबना आणि चोरी
नांदेड(प्रतिनिधी) -मुखेडच्या पंचायत समिती गोडाऊनमधून इंदीरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी ठेवलेल्या 19 हजार रुपये किंमतीच्या 19 शेगड्या चोरण्यात आल्या आहेत. मौजे सावळी ता.बिलोली येथील लक्ष्मी मंदिरातून 6 हजार रुपये किंमतीच्या दागिण्यांची चोरी झाली आहे. पिंपरणवाडी ता.लोहा येथून 25 हजार रुपये किंमतीची एक दुचाकी चोरीला गेली आहे.
पंचायत समिती मुखेडचे कनिष्ठ लिपीक संतोष बाबूराव मठपत्ती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जानेवारी 2022 च्या सकाळी 10.30 ते 10 जानेवारी 2022 च्या दुपारी 3 वाजेदरम्यान पंचायत समिती मुखेडचे गोडाऊन कोणी तरी चोरट्यांनी तोडले. त्यात सन 2014-15 मधील इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप करणयासाठी ठेवलेल्या 19 शेगड्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. या शेगड्यांची किंमत 19 हजार रुपये आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.
जगन्नाथ काशिनाथअप्पा देवत्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 13 जानेवारीच्या सकाळी 10 वाजेदरम्यान सावळी ता.बिलोली येथील राचन्ना महादेव मंदिर येथे नंदीच्या मुर्तीची तोडफोड करून विटंबना केली आहे. तसेच लक्ष्मी मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिणे, 6 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरून नेले आहेत. बिलोली पोलीसांनी हा गुुन्हा क्रमांक 18/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 295, 454, 357 आणि 380 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे. बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे अधिक तपास करीत आहेत.
दिगंबर बळीराम वरळे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एम.एच.6163 ही 9 जानेवारीच्या रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान पिंपरणवाडी शिवारातील रस्त्यावरून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार भुत्ते अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *