नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या स्विकृत सदस्यपदी ऍड. सुरेंद्रसिंघ लोणीवाले यांची नियुक्ती झाल्याचे पत्र अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड. सतिश पुंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऍड.लोणीवाले यांना दिले.
सन 2021 ते 2023 या कालावधीसाठी निवडूण आलेल्या अभिवक्ता संघामध्ये एक सदस्य स्विकृत सदस्य या पदावर नेमला जातो. यासाठी आज 14 जानेवारी रोजी संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.सतिश पुंड, सचिव ऍड. नितीन कागणे आणि विशिष्ट सहाय्यक ऍड.अजिम सिद्दीकी यांनी ऍड.सुरेंद्रसिंघ लोणीवाले यांना नांदेड अभिवक्ता संघाच्या कार्यकालीन विहित वर्षांसाठी स्विकृत सदस्य या पदावर नियुक्ती केली आहे. त्याचे पत्र आज ऍड. सुरेंद्रसिंघ लोणीवाले यांना देण्यात आले.
