नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगरसेवकाच्या घरात गुलाम पडल्याची माहिती खात्रीलायक सुत्रंानी दिली आहे. त्यामुळे गुलाम हा जगात किती आवडता आहे याची प्रचिती आली.
52 पत्यांमध्ये गुलामाचे महत्व खुप आहे. खरे तर त्या पत्यांमध्ये राजा-राणी पण असते. पण या गुलामाचे महत्व एवढे का आहे याचा शोध घेतला असता असे दिसले की, सुरूवात गुलामापासूनच होते. म्हणून 52 पत्यांमध्ये गुलामाला सर्वाधिक महत्व आहे. 5 हजार वर्षापासून भारतामध्ये जुगाराचा ईतिहास आहे. त्यामुळे आज जुगार बंद होईल अशी अपेक्षा करणे सुध्दा चुकीचे आहे. जुगार चालूही राहु द्या पण इतर बाबींप्रमाणे भारतीय संविधानाने दिलेल्या समान हक्कांचा हिशोब या जुगारामध्येपण आला तर किती छान होईल असे वाटते. त्यामुळे सर्वांना संधी मिळेल आणि सर्वच जण श्रीमंत होतील.
गुलामाच्या माध्यमाने वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरल्या जातात. ज्यामुळे आपल्या कानात एक छोटीशी मशीन लावून या गुलामाला शोधण्याची किमया सुध्दा आता जुगार अड्ड्यांवर सुरू झाली आहे. ज्यामुळे श्रीमंतीचा मार्ग लवकरच सुकर होतो. आणि म्हणूनच या गुलामाकडे समाजातील प्रत्येकाला आकर्षण आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगरसेवकाच्या घरी गुलाम पडला म्हणजे त्याची व्याप्तीपण मोठी असेल म्हणूनच त्या जागेला जास्त महत्व आहे जेथे हा गुलाम पडला आहे.
पोलीस दलात मागील 13 महिन्यापुर्वी पहिल्यांदा सुर्याजी पिसाळाचा प्रवेश झाला त्यानंतर हळुहळु मिर जाफर आणि मिर सादीकांची वाढ झाली आणि सिंहासनाच्या मर्जीविरुध्द असे गुलाम पाडले जातात त्यांना या ऐतिहासीक व्यक्तींचा पाठींबा असतो आणि म्हणूनच त्या गुलामावर कार्यवाही होत नाही. सुर्याजी पिसाळ, मिर जाफर आणि मिर सादीक अशा व्यक्तीमत्वांच्या सोबत वावरून बाहेर समाजातील मंडळी बरेच धंदे करतात. पण मी काय-काय करू या शब्दामुळे अशा मंडळींचे फावते आणि गुलाम पाडण्याची प्रक्रिया कायम सुरू राहते.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगरसेवकाच्या घरी पडला म्हणे गुलाम