सुरक्षा मिळविण्यासाठी शेख जाकीर शेख सगीरने फोडलेला टाहो यशस्वी होईल काय ?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी आपल्याकडे असलेली पोलीस सुरक्षा काढल्यानंतर उच्च न्यायालयासमक्ष ओरड करणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरला आजपर्यंत तरी कांही धोका झाला नाही याचा अर्थ पोलीस सुरक्षा मागण्यामध्ये आपले मोठे पण दाखवता यावे ते पण फुकटात असाच हा प्रकार आहे. धोका होणार असता तर 22 डिसेंबर ते आज 15 जानेवारी पर्यंत झाला असता पण असे कांहीही झालेले नाही म्हणजे सुरक्षेची नुसती ओरड आहे गरज कांही नाही हे स्पष्ट पणे जाणवते.
शेख जाकीर शेख सगीरने सन 2013 मध्ये बनावट पणाचा धोका तयार करून स्वत:साठी एक पोलीस सुरक्षा रक्षक मिळवला. ऐवढच नव्हे तर आपल्या घरी अर्धापूर पोलीसांचे रात्रीचे गस्तीपथक यावे आणि आपल्या घरी ठेवलेल्या डायरीवर स्वाक्षरी करावी याची पण सोय करून घेतली. सन 2013 ते 22 डिसेंबर 2021 पर्यंत अशा कोणत्याही परिस्थितीची घटना घडली नाही ज्यामुळे शेख जाकीर शेख सगीरच्या जीवीताला धोका निर्माण होवू शकतो. स्वत:ला व्हिस्टल ब्लोअर असे याचिकेत म्हणून घेणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरने खरे तर व्हिस्टल ब्लोअर या शब्दाचा अपमानच केला आहे. एखादी व्यक्ती जी अधिकाऱ्यांना सांगत असते की, एखाद्या सरकारी विभागात किंवा खाजगी संस्थेत कांही तरी बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत आणि अन्यायाविरुध्द आवाज उठवणे असा त्या व्हिस्टल ब्लोअर शब्दाचा खरा अर्थ आहे. पण व्हिस्टल ब्लोअर या शब्दाला अपेक्षीत कोणते काम शेख जाकीर शेख सगीरने केले आहे. याचे कांही स्पष्टीकरण याचिकेत नाहीत. फक्त माझ्यामुळे कांही लोकांवर गुन्हे दाखल झाले असे त्या याचिकेत लिहिले आहे. एखाद्या व्यक्तीमुळे कोणावर गुन्हे दाखल होणे हा व्हिस्टल ब्लोअरचा प्रकार नव्हे असे भाषा तज्ञांनी सांगितले. खरे तर व्हिस्टल ब्लोअर कोण आहेत हे कोणालाच कळायला नको तो खरा व्हिस्टल ब्लोअर असतो.
2013 पासून फुकटाच्या पोलीस सुरक्षेचा वापर करून समाजात, अधिकाऱ्यांसमक्ष या शेख जाकीर शेख सगीरने दाखविलेले नाट्य रुपांतरण नांदेड जिल्हा पोलीसांनी त्याची सुरक्षा काढून समाप्त केले. ते नाट्यरुपांतरण पुन्हा एकदा सुरू करता यावे म्हणून उच्च न्यायालयासमक्ष माझी सुरक्षा काढली, मला मृत्यूची भिती आहे असे तो दाखवत आहे. ज्याला कोणाला मारायचे आहे तो सुरक्षेचाही विचार करेल काय हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. भारतात सर्व प्रसिध्द व्यक्तीमत्व मनिंदरजितसिंघ बिट्टा यांच्याकडे झेड प्लस सुरक्षा आहे. तरीपण त्यांच्यावर सातवेळेस हल्ला झाला होता. त्यांच्या सुदैवाने त्यांना काही इजा झाल्या पण ते आजही अन्यायाविरुध्द मोठा आवाज करून बोलतात.
ज्या व्यक्तीला अन्यायाविरुध्द बोलायचे आहे त्याला सुरक्षा रक्षकाची गरज काय? तो समाजाचेच भले करण्यासाठी काम करत असेल तर समाज सुध्दा त्याचे रक्षण करेलच! यासाठी भारताचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस सांगत होते. मला सुरक्षेची गरज नाही मला मारायचे असेल तर जनताच मारेल आणि वाचवायचे असेल तर जनताच वाचवेल. अत्यंत नामांकित अशा व्यक्तीने सांगितलेल्या या शब्दांचा अनुभव नांदेडमध्ये सुध्दा अनेकांना आलेला आहे.
शेख जाकीर शेख सगीरने पोलीस खात्यातील सुर्याजी पिसाळ आणि कांही मिर सादीक आणि मिर जाफर यांच्या मदतीने पोलीस खात्यात गुप्त असलेली अनेक पत्रे प्राप्त करून रिट याचिकेच्या माध्यमातून ती गुप्त पत्रे जाहीर केली आहेत. पोलीस विभाग त्यासाठी प्रतिउत्तर देण्यासाठी जोरदार तयारीत राहिल अशी अपेक्षा आहे. याबाबत सुध्दा न्यायमुर्तींनी विचार करून शेख जाकीर शेख सगीरला पोलीस सुरक्षा देण्याचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *