पिंपरी महिपाल येथील दोघांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा  आणि प्रत्येकी 3 हजार रुपये रोख दंड 

नांदेड(प्रतिनिधी)-शेती कामासाठी आले नाहीत म्हणून दोन जणांनी जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणात आज 15 जानेवारी 2022 रोजी अर्थात 10 वर्षानंतर नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी दोन जणांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि          प्रत्येकी 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. 
                 पिंपरी महिपाल ता.अर्धापूर येथील सौ.रमाबाई चांदु खिल्लारे यांनी 26 एप्रिल 2012 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी 7 वाजता पिंपरी महिपाल येथील रोहिदास नागेाराव कदम (31) आणि कपील प्रकाश कदम(20) हे दोघे आले आणि त्यांनी आमच्या शेतीच्या कामासाठी काल का आला नाहीस असे म्हणून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. लिंबगाव पोलीसांनी हा गुन्हा ऍट्रोसिटी कायद्यासह विविध कलामन्वये दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधिक्षक निर्मलादेवी यांनी केला होता. 
                     या सत्र खटल्या झालेल्या साक्षीपुराव्यांच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी रोहिदास नागोराव कदम आणि कपील प्रकाश कदम या दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 323 नुसार कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा आणि दोघांना प्रत्येकी 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *