नांदेड(प्रतिनिधी)-नालंदानगर, चैतन्यनगर भागात एक घर फोडून चोरट्यांनी तीन लाख 60 हजार रुपये रोख रक्कम लांबवली आहे. नायगाव आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
विश्रांती अविनाश कांबळे या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 14 जानेवारी रोजी दुपारी 2.30 या अडीच तासांच्या कालखंडात त्यांचे घर बंद असतांना मागील बाजूचे चॅनलगेट कुलूप तोडून घरातील शयनकक्षात कपाटातील 3 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम चोरटयांनी चोरून नेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
नायगाव ते नरसी जाणाऱ्या रस्त्यावर चिद्रावार कापड दुकानासमोर बापूराव पुरभाजी शेट्टे यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एम.6098 दि.12 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता उभी केली. अर्ध्या तासातच ती 30 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार साईनाथ सांगवीकर अधिक तपास करीत आहेत.
नमस्कार चौकाजवळ दि.3 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत गजानन पांडूरंग पुयड यांची 88 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एम.1199 चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार देशमुख अधिक तपास करीत आहेत.
नालंदानगर येथे एका महिलेचे घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 60 हजारांवर मारला ढल्ला