नांदेड(प्रतिनिधी) -प्राथमिक केंद्र हणेगाव येथे एका व्यक्तीने डॉक्टर कोठे आहे मला उपचार घ्यायचा आहे असे म्हणून दगडफेक करून दवाखान्याचे 5 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.
संदीप व्यंकटराव म्हेत्रे हे प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगाव येथे सेवक आहेत. 15 जानेवारीच्या रात्री 3 वाजता तेथे एक जण आला आणि डॉक्टर कोठे आहेत. मला उपचार घ्यायचा आहे असे ओरडत शिवीगाळ केली. म्हेत्रेंना धक्काबुक्की करून आपल्या हातातील दगड सरकारी दवाखान्याच्या मुख्य दारावर फेकून 5 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे अधिक तपास करीत आहेत.
हणेगाव प्राथमिक केंद्रावर दगडफेक