1 लाख 54 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्यात आले आहेत. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घर फोडण्यात आले आहे आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे. या चार चोरी प्रकरांमध्ये 1 लाख 53 हजार 900 रुपये लंपास झाले आहेत.
समरीन बेगम शकील खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जूनच्या रात्री 11.45 ते 8 जूनच्या सकाळी 6 वाजेदरम्यान त्यांचे पती बाहेर गावी गेल्याने त्या आपल्या घरास कुलूप लावून मुलाबाळांसह रात्री भावाच्या घरी गेल्या. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. यात सोन्या व चांदी दागिणे आणि रोख रक्कम असा 90 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक ठाकूर अधिक तपास करीत आहेत.
गोविंदनगर भागातील सुवर्णमाला गोपीनाथ जुकंटे यांचे घर चोरट्यांनी 7 जूनच्या सायंकाळी 7 वाजता फोडले. त्या आपल्या घराला कुलूप लावून चाकूर तालुक्यातील लिंबलवाडी या आपल्या सासरच्या गावी गेल्या होत्या. घरातून चोरट्यांनी रोख 5 हजार रुपये अणि इतर साहित्य असा एकूण 26 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
ज्ञानेश्र्वर घोडके यांचे घर ग्रीन पार्क कॉलनी शिवरायनगर रोड येथै आहे. 6 जूनच्या रात्री 12 वाजेपासून ते 7 जूनच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते आपल्या बहिणीकडे गेले असतांना त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले आणि त्यातून 5 हजार रुपये किंमतीचा एक टी.व्ही. चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गोणारकर हे अधिक तपास करीत आहेत.
मोहम्मद मोईन खुरेशी मोहम्मद सुलतान खुरेशी यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एम.7411ही गाडी 7 जूनच्या रात्री 10 ते 8 जूनच्या पहाटे 6 वाजेदरम्यान इम्रान कॉलनी देगलूर नाका येथून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 32 हजार रुपये आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार विक्रम वागडे हे अधिक तपास करीत आहेत.
तीन घरफोड्या आणि एक दुचाकीची चोरी