नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे खोतकाम करतांना सापडलेल्या महिलेच्या प्रेतासंदर्भाने हदगाव पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. या महिलेला दोन-तीन दिवसांपुर्वीच या ठिकाणी गाढले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.
17 जानेवारी सायंकाळी 7.30 वाजेच्यासुमारास दत्तबर्डी माळाच्या पायथ्याजवळ हदगाव येथे एका अनोळी महिलेचे प्रेत सापडले. याबाबत हदगाव पोलीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 8/2022 दाखल केला आहे. सापडलेल्या अनोळी मयत महिलेचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. त्यांचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असावे पण प्रेत पाहिले असता हे वय जास्तपण असू शकते. त्यांचा बांधा सडपातळ आहे. वर्णण सावळ आहे. त्यांनी फिक्ट पिवळ्या रंगाचा गाऊन आणि गुलाबी रंगाचे स्वेटर परिधान केलेले आहे. त्यांचे समोरचे दात पडलेले आहेत. त्यांची उंची 4.5 इंच आहे. केस काळ्यारंगाचे आहेत. त्यांच्या छातीवर तिळ आहे.
हदगाव पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी मयत महिलेला कोणी ओळखत असले तर त्यांनी याबाबतची माहिती हदगावचे पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड, मोबाईल नंबर 8888717999, पोलीस उपनिरिक्षक दिपक फोलाने मोबाईल क्रमांक 9673147306 आणि पोलीस उपनिरिक्षक संगिता कदम 7972599495 यावर सुध्दा माहिती देता येईल. कांही प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, या महिलेला दोन -तीन दिवसांपुर्वीच येथे गाढले असावे.
हदगाव पोलीसांनी खोतकाम करतांना सापडलेल्या अनोळखी मयत महिलेबाबत जारी केली शोधपत्रिका