अर्धापूर नगरपंचायतीत कॉंग्रेसचा एक हाती विजय

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर नगर पंचायतच्या निवडणुकीत 17 प्रभागांपैकी 10 प्रभागांवर कॉंग्रेसने विजय मिळवला पण त्यांचा माजी नगराध्यक्ष पराभूत झाला. इतर विजयांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा विनयभंगाचा आरोपी निवडूण आला. भारतीय जनता पार्टीने दोन जागा जिंकल्या आहेत. तर एमआयएम पक्षाने तीन जागांवर विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीतील निकालानंतर कॉंगे्रसची आवस्था एका विचारवंताच्या शब्दाप्रमाणे
आग है खुब थोडा पाणी है।
ये यहॉं रोज की कहानी है ।।
खुद सें करना है कत्ल खुद को ही।
और खुद ही लाश भी उठानी है।।
अशी झाली आहे.
अर्धापूर नगर पंचायत निवडणुकीमध्ये एकूण 17 प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार वार्ड क्रमांक 1-शालीनी राजेश्र्वर शेट्टे, वार्ड क्रमांक 4- डॉ.पल्लवी विशाल लंगडे, वार्ड क्रमांक 6- सोनाजी सरोदे, वार्ड क्रमांक 7- छत्रपती कानोडे, वार्ड क्रमांक 8- वैशाली प्रविण देशमुख, वार्ड क्रमांक 9- मिनाक्षी व्यंकटी राऊत, वार्ड क्रमांक-11 सायरा बेगम काझी, वार्ड क्रमांक 12-यासमीन सुलताना मुस्सबीर खतीब, वार्ड क्रमांक 16-सलीम कुरेशी, वार्ड क्रमांक-17 नामदेव सरोदे असे दहा उमेदवार निवडून आले आहेत. कॉंगे्रसनंतर वार्ड क्रमांक 13-मिर्झा शहबाज बेग, वार्ड क्रमांक 14- रोहिणी इंगोले, वार्ड क्रमांक 15- आतिख रहेमान असे तीन उमेदवार एमआयएम पक्षाचे निवडूण आले आहेत. त्यानंतर वार्ड क्रमांक 2 -बाबूराव लंगडे आणि वार्ड क्रमांक 5- कोन्होपात्रा प्रल्हाद माटे हे दोन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडूण आले आहेत. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंगे्रसचा विनयभंगचा आरोप असलेला आरोपी शेख जाकीर शेख सगीर निवडूण आला आहे. वार्ड क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार मुक्तेदर खान पठाण हे उमेदवार निवडूण आले आहेत.
निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आणि या निवडणूकीतील आपला वरचष्मा राखण्यात कॉंगे्रस पक्षाला यश आले. पण त्यांचा माजी नगराध्यक्ष मोहम्मद लायख मोहम्मद सिद्दीकी याला मात्र पराभवाचा झटका विनयभंगाच्या आरोपीमुळे मिळाला. कॉंगे्रस पक्षाला आपले काय चुकले याचा शोध घ्यावाच लागेल. मोहम्मद लायखला 466 मतदान मिळाले आणि विनयभंगाचा आरोपी तथा बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीचा अध्यक्ष शेख जाकीर शेख सगीर 599 मते प्राप्त करून 133 मताधिक्यांनी निवडूण आला. खरे तर कॉंग्रेस पक्षाने आता त्यालाच कॉंगे्रस पक्षात घेवून नगराध्यक्ष करू नये म्हणजे कमावले. खरे तर या प्रभागामध्ये एक विशिष्ट गट कॉंगे्रसच्यावतीने कोण्या तरी दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी मागत होता. पण विद्यमान नगराध्यक्षाला डावलून नवीन व्यक्तीला उमेदवारी देण्यात कॉंगे्रस पक्षाने रस दाखवला नाही तेंव्हा कॉंग्रेस पक्षातून नाराज असलेल्या त्या गटाने या विनयभंगाच्या आरोपीला राष्ट्रवादीकडून तिकिट आणावे असे सांगितले आम्ही तुला मदत करू असे आश्र्वास दिले असल्याची चर्चा यावेळी सुरू होती. याच आश्वासनावर शेख जागीर शेख सगीरने कॉंगे्रस विद्यमान नगराध्यक्षाला पराभूत केले आहे. अशा परिस्थितीत कॉंगे्रसला आता यावर विचार करणे आवश्यक आहे की, जो गट त्या प्रभागात नाराज होता त्यांना आपल्याकडे राखण्यात कॉंगे्रसला अपयश आले. शेख जाकीर शेख सगीरचे कारनामे अर्धापूरकरांना, प्रभांग क्रमांक 3 मधील नागरीकांना सुध्दा माहित असतांना त्याला 133 मतांचे अधिक्य मिळणे ही कॉंगे्रससाठी विचार करण्याची वेळ आहे. शेख जागीर शेख सगीर निवडूण आल्याने त्याने अर्धापूरच्या बसस्थानक ते न्यायालयापर्यंत मांडलेले त्याचे अतिक्रमण आता काढले जाईल की नाही यावर एक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. या अतिक्रमणाच्या जागेतून भाडे कमविण्याचा धंदा मागील अनेक वर्षापासून सुरू आहे.
उठ ऐ कलम संवाद कर ।
शब्दोंकों जिंदाबाद कर ।।
मत चल लकिरों पे कभी।
जो भी कर अपवाद कर ।।
या विचाराप्रमाणे आम्ही कॉंग्रेस पक्षाबद्दल मत मांडले आहे. जनतेने एका अशा माणसाला निवडूण दिले आहे की, ज्याच्याकडे पाहुन लोक आपले तोंड बदलतात. आता तर या भागातील जनतेची आवस्था अशी होणार आहे की, आईना भी कमाल करता है। जान लेवा सवाल करता है।। अब हम मकॉं बेचकर कहॉं जाएँ हर पडोसी सवाल करता है।। अशी होणार आहे. पाच वर्षापर्यंत जग भरपूर बदलत असते. या जनतेच्या परिस्थितीत बदल होण्याऐवजी त्यांना त्रास किती होणार आहे हा प्रश्न प्रभाग क्रमांक 3 च्या लोकांना विचार देण्याइतपत योग्य ठरला नाही. शेख जाकीर शेख सगीरला निवडूण देणाऱ्या जनतेबद्दल आमचे असे मत आहे की,
सच कहु इंसानियत दल-दल में है।
आदमी तो आज भी जंगल में है।।
आप सोना ढुंढते है किस लिये।
आज कल गहीरी चमक पितल में है ।।
आम्ही मांडलेला शब्द प्रपंच एका विचारवंताच्या सांगण्याप्रमाणे
वो तो सबकी राम कहानी कहता है ।
लेकीन अपनी खास जबानी कहता है।।
रुक पाया कब जीवन दु:ख के टिलों पर।
बहती नदीसे खारा पाणी कहता है।।
या पध्दतीने आमच्या शब्दांचा वापर करून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या बद्दल एक विचारवंत म्हणतो,
सब के दिलो में धडकना जरुरी नहीं होता ।
कुछ लोगों की आँखो में खटकने का भी एक अलग मजा है।।
कॉंग्रेसच्या अर्धापूरच्या नगर पंचायतीतील एक हाती सत्ता मिळविण्याचे अभिनंदन करतांना प्रभाग क्रमांक 3 च्या जनतेला पुढील पाच वर्ष त्रास सोसन्याची हिंमत मिळावी अशी अपेक्षा आहे. म्हणूनच वामनदादा कर्डक म्हणतात की,
पेटता पेटता बोलली रे चिता,
जा मुलांनो आता संपली रे कथा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *