नांदेड,(प्रतिनिधी)- आज बुधवारी कोरोना विषाणूने एकूण ७५८ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३३८३ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९३.६७ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात ३४.२८ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ६१.६१ टक्के रुग्ण आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १९ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. मरण पावलेले रुग्ण सावरगाव तांडा ता.किनवट येथील आहेत. आज ७५८ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-४२०, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -१२, खाजगी रुग्णालय-०५, तालुक्यातील गृह विलगीकरण-३७,अश्या ४७४ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८९३७४ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३.६७ टक्के आहे.
आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-४६७, मुखेड-२२, नांदेड ग्रामीण-७०, किनवट-३७, मुदखेड-३१,हदगाव-०३,बिलोली-०३, अर्धापूर-०२,देगलूर-०६, लोहा- २६,माहूर-१४,कंधार-१४, नायगाव- ०४,भोकर-०१, उमरी-०४,धर्माबाद- २०, परभणी-१३,हिंगोली-१४, हैद्राबाद-०७, लातूर-०१, अमरावती-०६,नंदुरबार -०१, उमरखेड-०१, अकोला-०१,असे आहेत.
आज २२११ अहवालांमध्ये १३७८ निगेटिव्ह आणि ७५८ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९५४१३ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ६८१ आणि ११ अँटीजेन तपासणीत असे एकूण ७५८ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ६६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०९ आहेत.
आज कोरोनाचे ३३८३ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -२५६०, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-७५७,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३३, खाजगी रुग्णालयात- २२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०८,हदगाव रुग्णालय-०१,बिलोली रुग्णालय-०२, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.