नांदेड(प्रतिनिधी)-आज 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात दोन्ही महापुरूषांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरिक्षक हनमंत मिटके, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, लघुलेखक वडजे इतर शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत भारताच्या स्वातंत्र्यात महत्वपूर्ण योगदान देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वतंत्र भारतात मराठी अस्मिता जागविणारे बाळासाहेब ठाकरे या दोन्ही महापुरूषांना वंदन करून त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि या दोन महापुरूषांचा जयंती सोहळा साजरा झाला. या कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, विनोद भंडारे यांनी केले होते.