नांदेड,(प्रतिनिधी)- आज दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी मनपाच्या क्षेत्रिय कार्यालय क्र.4 (वजिराबाद) हद्दीतील प्रभाग क्र. 17 अंतर्गत डॉ. लेन, येथील तुकामाई होस्पीटल यांनी बॉयो-मेडीकल वेस्ट मनपाच्या घंटागाडी (टाटा-एस) मध्ये टाकून शहरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभिर धोका निर्माण केल्याच्या कृत्याबद्दल संबंधित हास्पीटल विरुध्द अक्षरी रुपये दहा हजार रुपये रोख दंड कार्यवाही करुन दंड वसूल करण्यात आलेले आहे. तसेच बायो मेडीकल वेस्ट नियमांचे उल्लंघन करणा-या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यां विरुध्द कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.
सदरची कारवाई मा. आयुक्त डॉ. सुनिल लहाने अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उप आयुक्त शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे सहा आयुक्त मो. गुलाम सादेक, क्षेत्रिय अधिकारी डॉ. रईसोद्दीन, स्वच्छता निरिक्षक राजेंद्र गदमवार, वसिम तडवी, मोहन लांडगे व ईतर कर्मचारी हजर होते.
शहरातील सर्व हॉस्पीटल क्लिनिक / दवाखाने इत्यादी व्यवसाय धारकांना नांदेड वाघाळा शहरमहानगरपालिका जाहिर आवाहन करण्यात येते की, दैनंदिन निर्माण होणारा जैविक कचरा (Bio-medical waste) मनपाच्या घंटागाडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी/रस्त्यावर अनाधिकृत रित्या न टाकता मनपाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे सुपूर्द करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा घनकचरा व्यवस्थापन नियम-2016 व बॉयोमेडीकल वेस्ट हेन्डलींग रुल्स् 1998 मधील तरतुदीनुसार संबंधित वैद्यकीय व्यवसाय धारका विरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.