नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मुलीचा भुखंड ग्रामसेवक व सरपंच यांना सांगून त्याची नोंद गाव नमुना क्रमांक ८ मध्ये घेण्यासाठी लाच मागणी करणार्या पाणी पुरवठा कर्मचार्याविरुध्द ४ हजार रुपयांची लाच मागितली अशा आशयाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
१९ जानेवारी रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यंाच्या मुलीच्या नावाचा भुखंड बाभुळगाव ता.जि.नांदेड येथील सरपंच आणि ग्रामसेवकाला सांगून तो भुखंड गाव नमुना क्रमांक ८ मध्ये नोंद घेण्यासाठी बाभुळगाव येथील पाणी पुरवठा कर्मचारी माधव बाबाराव जाधव हा ४ हजार रुपये लाचेची मागणी करत आहे. या लाच मागणीबाबत १९ आणि २० जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी झाली. तेंव्हा सुरूवातीला ५ हजार रुपये लाच मागणारा पाणी पुरवठा कर्मचारी माधव बाबाराव जाधव याने तडजोडीनंतर ४ हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार बाभुळगाव ता.जि.नांदेड येथील पाणी पुरवठा कर्मचारी माधव बाबाराव जाधव विरुध्द भ्रष्टाचार अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही कार्यवाही प्रभारी पोलीस अधिक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंह चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक दत्ता केंद्रे, पोलीस अंमलदार संतोष शेट्टे, किशन चिंतोरे, बालाजी तेलंगे, मारोती सोनटक्के यांनी पार पाडली.
–
गाव नमुना ८ क्रमांकावर भुखंडाची नोंद घेण्यासाठी ४ हजारांची लाच मागणार्याविरुध्द गुन्हा दाखल