मंगळवारी कोरोना संख्या ३० ने घटली;आज दिले ४५४ नवीन रुग्ण;एका महिला रुग्णाचा मृत्यू 

नांदेड,(प्रतिनिधी)- आज सोमंगळवारी कोरोना विषाणूने एकूण ४५४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४२०१ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९३.०९ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात २६ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ५१.५४ टक्के रुग्ण आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २५ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एका ६८ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. करखेली  ता. धर्माबाद येथील महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.. आज ४५४ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                         नांदेड मनपा विलगिकरणातून-३९८, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०४, खाजगी रुग्णालय-११, तालुक्यातील गृह विलगीकरण-९६,जिल्हा कोवीड रुग्णालय-०१,अश्या ५१० रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२५७२ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३.०९ टक्के आहे.
             आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-२३४, मुखेड-०४, नांदेड ग्रामीण-४२, किनवट-२१, मुदखेड-०५, हदगाव-०२, बिलोली-१५, अर्धापूर-०७,देगलूर-१८, लोहा-१५,कंधार-१०,
नायगाव-२१, भोकर-०२, माहूर-०५,धर्माबाद-३०,परभणी-०८,हिंगोली-०२, औरंगाबाद-०१, यवतमाळ-०१,  उमरखेड-०२, मुंबई-०१, उत्तरप्रदेश-०१,पुणे-०१,वाशीम-०२,निझामाबाद-०१,चंदिगढ-०१, असे आहेत.
                          आज १७४६ अहवालांमध्ये १२४० निगेटिव्ह आणि ४५४ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९९४३३ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ३३० आणि १२४ अँटीजेन तपासणीत असे एकूण ४५४ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ४९ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०३ आहेत.
                                आज कोरोनाचे ४२०१ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -३०९७, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-१०२०,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३९, खाजगी रुग्णालयात- ३४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०५,हदगाव रुग्णालय-०४,किनवट-०२, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०५ रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *