ग्रामीण रुग्णालय बिलोलीत कर्मचाऱ्यांकडे सापडले गावठी पिस्तूल;एक दिवस पोलीस कोठडीत

नांदेड,(प्रतिनिधी)- सरकारी रुग्णालय बिलोली येथे कार्यरत एका सफाई कामगाराकडून वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गावठी पिस्तूल जप्त केले आहे.मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन पाटील यांनी त्यास एक दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. 
                  १९ जानेवारी २०२२ रोजी गोवर्धनघाट परिसरात एक माणूस लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवून भीती दाखवत होता.अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर वजिराबादचे पोल्सी निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या सहकारी सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार आणि त्यांच्या सहकारी पोलिसांना त्यास पकडण्याच्या सूचना दिल्या.याबाबत माहिती काढण्यात आली आणि त्यानुसार २४ जानेवारी २०२२ रोजी बिलोली ग्रामीण रुग्णालयातून पकडण्यात आले.त्याचे नाव सोमेश मदनसिंग बिडला (२९) रा.जुना कौठा नांदेड असे आहे.आज त्यास न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन पाटील यांनी सोमेश बिडलाला एक दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.या कामगिरीत पोलीस अंमलदार विजयकुमार नंदे,मनोज परदेशी,गजानन किडे,शरदचंद्र चावरे,संतोष बेलुरोड,व्यंकट गंगुलवार,शेख इम्रान यांनी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *