एकूण रुग्ण संख्या एक लाख पेक्षा जास्त
नांदेड,(प्रतिनिधी)- आज बुधवारी कोरोना विषाणूने एकूण ६११ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४२०६ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९३.१३ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात ३६.२८ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ५६.३० टक्के रुग्ण आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २६ जानेवारी रोजी कोरोना बाधेने तीन पुरुष आणि एक महिला रुग्णाचा असे चार मृत्यू झालेले आहेत. मृत्यू पावणारे रुग्ण पुढील प्रमाणे आहेत. सर्व रुग्ण सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे मरण पावले आहेत.त्यात धनेगाव नांदेड पुरुष वय ७०,हडको नांदेड पुरुष वय ७०,हदगाव पुरुष वय ६२ आणि नेवरी ता.हदगाव महिला वय ६३ असे आहेत.आज ६११ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-४७०, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०४, खाजगी रुग्णालय-१२, तालुक्यातील गृह विलगीकरण-११०,जिल्हा कोवीड रुग्णालय-०२,हदगाव रुग्णालय-०४, अश्या ६०२ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९३१७४ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३.१३ टक्के आहे.
आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-३४४, मुखेड-२९, नांदेड ग्रामीण-५८, किनवट-६३, मुदखेड-०२, हदगाव-०३, बिलोली-१८, अर्धापूर-०६,देगलूर-०४, लोहा-१५,कंधार-०६, औरंगाबाद-०२,नायगाव-१४, भोकर-१०, माहूर-०६,धर्माबाद-१२, हिमायतनगर-०२,उमरी-०१, परभणी-०४, हिंगोली-०५, यवतमाळ-०२,अकोला-०१, पंजाब-०२, आदिलाबाद-०२, असे आहेत.
आज १६८४ अहवालांमध्ये ९९४ निगेटिव्ह आणि ६११ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०००४४ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ५१७ आणि ९४ अँटीजेन तपासणीत असे एकूण ६११ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ४९ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ३० आहेत.
आज कोरोनाचे ४२०६ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -२९६८, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-११५९,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३६, खाजगी रुग्णालयात- ३८७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०३,किनवट-०२, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.