नांदेड(प्रतिनिधी)-ऑनलाईन जुगार आणि मटका जुगार एकाच ठिकाणी दोन सुविधा जनतेला देण्याची एक नवीन पध्दत छत्रपती चौकात सुरू झाली आहे.
एकाच ठिकाणी दोन प्रकारच्या विविध सुविधा देण्याचा प्रघात व्यवसायात आलेलाच आहे. त्यानुसार छत्रपती चौकामध्ये एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ऑनलाईन जुगार आणि मटका असे दोन व्यवसाय एकाच जागी देऊन व्यवसायीकांनी जनतेची सोय केली आहे. सोबतच या इमारतीमध्ये खालच्या मजल्यावर मद्याची सोय पण आहे. ऑनलाईन जुगार हा एक नवीन प्रकार आला. मुळात तो जुन्या गुडगुडी खेळासारखा आहे. गुडगुडीमध्ये एका लाकडाच्या ठोकळ्यावर लिहिलेल्या क्रमांकाप्रमाणे नंबर यायचे आता हा प्रकार संगणकाच्या माध्यमातून सुरू झाला आहे. त्यालाच ऑनलाईन जुगार असे म्हणतात. आजपर्यंत कोणीच जुगार खेळणारा श्रीमंत झाला नाही. यावरून जुगारामध्ये सुरू असलेल्या विविध प्रकारच्या गुप्त कारवाया समोर आल्या. ज्यामुळे जुगार चालकाला तोच क्रमांक काढण्याची त्या संगणकात सोय आहे म्हणजे जुगार खेळण्यासाठी आलेला माणुस ज्या नंबरवर पैसे लावील त्यापेक्षा वेगळा नंबर येथे काढला जातो आणि जुगारी हारतो.
जुगार चालकांनी नांदेडच्या वरच्या भागात, मालेगाव, पुर्णाकडे जाणाऱ्या रस्त्यांना जुगार अड्ड्याची जागा म्हणून शोधण्याचे कांही विशेष कारण आहे काय? खरे तर याचा शोध होण्याची गरज आहे. जेणे करून इतर गरजू व्यवसायीकांना सुध्दा या जागा सापडतील आणि आपला नवीन व्यवसाय ते चांगल्या पध्दतीने या रस्त्यांवर चालवू शकतील. एकूणच ऑनलाईन जुगार हा आलेला नवीन धंदा कशा पध्दतीने तेथे चाविला जातो. त्यावरून त्या व्यवसायाचे भविष्य ठरणार आहे. ऑनलाईन जुगार चालकांवर महाराष्ट्र जुगार कायदा लागू होत नाही असे ते जुगार चालक सांगतात पण त्यातील सत्यता काय आहे हे प्रशासनाने कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही. खरे तर त्यांना त्या व्यवसायातील परवाने आहेत काय? आणि नसतील तर ते कसे चालू आहेत याचा शोध सुध्दा होण्याची गरज आहे. जुगार चालकांना परवाना असतो असे तर कधीच ऐकण्यात आलेच नाही. पण असेल तर हा चांगला व्यवसाय कायम सुरू राहिल.