नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रहेमतनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. सोबतच खतगाव येथून 30 हजार रुपये किंमतीची एक लालरंगाची गाय चोरण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याती दुचाकी गाड्यांच्या चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
मोहम्मद वासे मोहम्मद इब्राहिम हे महानगरपालिकेतील कर्मचारी आहेत. दि.21 जानेवारीच्या दुपारी 4.30 ते 27 जानेवारीच्या सकाळी 9 वाजेदरम्यान त्यांचे घर बंद होते. ते मुंबईला गेले होते. 27 जानेवारीला परत आले तेंव्हा त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडलेला होता. तपासणी केली तेंव्हा कपाटातील 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम, 45 हजार रुपये किंमतीचे 15 ग्रॅम सोन्याचे नॅकलेस आणि 15 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या 45 हजार रुपये किंमतीच्या असा एकूण 2 लाख 20 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबला होता. इतवारा पेालीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 16/2022 कलम 454, 457, 380 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांच्याकडे देण्यात आला आहे.
बालाजी लक्ष्मण पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जानेवारीच्या सायंकाळी 5 ते 25 जानेवारीच्या सकाळी 5 वाजेदरम्यान खतगाव शिवारातून त्यांची 30 हजार रुपये किंमतीची एक लालरंगाची गाई कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेली आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार अशोक इंगळे हे करीत आहेत. यासोबतच पोलीस अभिलेखात दुचाकी गाड्या चोरी होण्याचे बरेच गुन्हे मागील 24 तासात नोंदविण्यात आले आहेत.
घरफोडले; गाय चोरली; दुचाकी गाड्यांची चोरी