इंजिनिअर नवरा, शिक्षक सासरा, शिक्षीका सासूसह सात जणांविरुध्द गुन्हा
नांदेड(प्रतिनिधी)-एका 20 वर्षीय विवाहितेने तक्रार दिल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळीला तलाक-तलाक-तलाक असे म्हणणे महागात पडले असून अभियंता, शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थी, एस.टी.वाहक अशा सात जणांविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 20 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 नोव्हेंबर रोजी आणि 14 नोव्हेंबर रोजी धांडेगल्ली कारंजा बीड येथे तिचा अभियंता असलेला नवरा शेख रोहिब शेख जावेद, शिक्षक असलेले सासरे शेख अब्दुल शेख जावेद, शिक्षीका असलेली सासू शेख यासमीन बेगम शेख जावेद व इतर शेख अमान शेख जावेद, सय्यद आरेफ अली सय्यद कुरशीद अली, सय्यद अयाज अली सय्यद कुरशीद अली आणि शेख अलहाज शेख अब्दुल मजिद या सात जणांनी तिला माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसीक छळ केला. तसेच उपाशी पोटी ठेवून तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी तिचा नवरा शेख रोहिब शेख जावेदने तलाक-तलाक-तलाक असे बोलून निघून गेला. विमानतळ पोलीसांनी सात जणांनाविरुध्द गुन्हा क्रमांक 34/2022 कलम 398(अ), 323, 504, 506 आणि 34 सह मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण कायदा कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कनाके अधिक तपास करीत आहेत.
तलाक-तलाक-तलाक म्हणणे पडले महागात