नायगाव बाजार (प्रतिनिधी)अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारे नायगाव तालुक्यातील मेळगावचे सरपंच अमोल महिपाळे याची सखोल चौकशी करुन कारवाई करावी. असे पत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठवले आहे. या पत्रावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे मेळगावच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणी गावातील विनोद शिंदे यांनी तक्रार केली होती.
नायगाव तालुक्यातील मेळगावचा सरपंच असलेला अमोल रामानंद महिपाळे (२७) हा नांदेड शहरात राहत होता. मात्र (ता.२५ ) मे रोजी तो व त्याचा मित्रांने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अमोलने पैसा खर्च करुन सरपंचपदी वर्णी लावून घेतली होती. पण सहा महिण्यातच बलात्कार प्रकरणात जेलमध्ये जावे लागल्याने त्याच्या रासलिलांच्या रसभरीत कहाण्या मेळगावमध्ये रंगू लागल्या. त्यामुळे आपण चुकीच्या माणसाची सरपंचपदी निवड केली असल्याचा पश्चाताप गावातील नागरिकांना होवू लागला आहे.
सरपंचाच्या कृष्ण कृत्यामुळे गावची मोठी बदनामी झाल्यामुळें गावातील विनोद आनंदराव शिंदे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांचेकडे एक तक्रार केली होती. त्यात मेळगावचे सरपंच अमोल महिपाळे यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा शिवाजी नगर नांदेड पोलीस ठाण्यात नोंद असून. त्यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ ( जे-५) चा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ सरपंचपदावरून काढण्यात यावे अशी मागणी केली होती.
या पत्राची दखल घेत बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना नुकतेच एक पत्र पाठवले असून. मेळगाव येथील विनोद शिंदे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्काळ चौकशी करुन नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश तर दिलेच आहेत पण फोनवरून संपर्क करुनही सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी मेळगावच्या सरपंचाबाबत काय निर्णय घेतात याकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.