नांदेड,(प्रतिनिधी)- आज सोमवारी कोरोना विषाणूने एकूण २१५ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २४०९ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९४.९९ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात १७.८७ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ५१.१६ टक्के रुग्ण आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ३१ जानेवारी रोजी कोरोना बाधेने चार रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. आज २१५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-२४२, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०७, तालुक्यातील गृह विलगीकरण-८५,अश्या ३३४ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९६४१५ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९४.९९ टक्के आहे.
आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-११०, मुखेड-०१, नांदेड ग्रामीण-१०, मुदखेड- ३, बिलोली-०१, किनवट-५६, कंधार- ०५, नायगाव-०२, लोहा-०४, धर्माबाद-०१,हिमायतनगर-०१, उमरी-०४, हदगाव-०३, भोकर-०१, परभणी-०९,हिंगोली-०२, वाशीम-०१,निझामाबाद-०१, असे आहेत.
३० जानेवारी २०२२ रोजी कोरोना बाधेने मरण पावलेले चार पुरुष रुग्ण पुढील प्रमाणे आहेत.सरकारी दवाखाना विष्णुपुरी- खडकपुरा पुरुष वय ८५ आणि वसमत जिल्हा हिंगोली पुरुष वय ७०,किनवट रुग्णालय-उमरखेड पुरुष ७७ तसेच खाजगी रुग्णालय- हौसिंग सोसायटी पुरुष वय ८२
आज १२०३ अहवालांमध्ये ८४९ निगेटिव्ह आणि २१५ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०१४९५ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत १८५ आणि ३० अँटीजेन तपासणीत असे एकूण २१५ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब १३८ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०१ आहेत.
आज कोरोनाचे २४०९ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१०५६, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-१२८१,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३६, खाजगी रुग्णालयात- ३२, किनवट-०४, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.