नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कोरोना परिस्थितीमुळे रखडलेल्या पोलीस पदोन्नतीमध्ये 453 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक पदावर पदोन्नती देत त्यांना नवीन पदस्थापना देण्याचे आदेश जारी केले आहेत.
आस्थापना शाखेचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांच्या स्वाक्षरीने 453 सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या पदोन्नत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातून चार सहाय्यक पोलीस निरिक्षक बदलून दुसरीकडे जात आहेत. तर नांदेड जिल्ह्यासाठी एक पोलीस निरिक्षक पदोन्नती घेवून नांदेडला येणार आहेत.
नांदेडला येणाऱ्या पोलीस निरिक्षकांमध्ये परभणी येथील शरद मरे यांंची नियुक्तीच्या नांदेडच्या बॉम्ब शोध व नाशक पथकात करण्यात आली आहे. नांदेड येथील भुमन्ना मारोती आचेवाड हे पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे पदोन्नतीवर जात आहेत. तसेच नांदेडच्या मुखेड पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष वैजनाथ केंद्रे आणि देगलूर पोलीस ठाण्यात कार्यरत कमलाकर गड्डीमे हे अनुक्रमे मुंबई शहर आणि नागपूर शहर येथे जात आहेत. नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील दत्ता केंद्रे दहशदवाद विरोधी पथक येथे पाठवण्यात आले आहेत. व्यतिरिक्त मागे नांदेडमध्ये कार्यरत असलेले संजय पिसे यांना राज्य गुन्हे अन्वेषन विभागातून नाशिक शहरात पाठविण्यात आले आहे. तसेच बीड जिल्ह्यात कार्यरत आनंद केशवराव झोटे यांना पदोन्नती देवून मुंबई शहरात नियुक्ती देण्यात आली आहे.