नांदेड(प्रतिनिधी)-सोन्याचे नाणे स्वस्तात देण्याची भुल देऊन 4 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार धानोरा घाट ता.किनवट येथे घडला आहे.
दिनेश दत्ता राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास चार अनोळखी लोकांनी सोन्याचे नाणे स्वस्तात देतो म्हणून त्यांना भुल दिली आणि त्यासाठी 4 लाख रुपये घेवून या म्हणून धानोरा घाटाच्या मुख्य रस्त्यावर बोलवले. तेथे आलेल्या अनोळखी लोकांनी 4 लाख रुपये घेतल्यावर सोने घेवून येतो असे सांगून गेले. पण परत आलेच नाहीत आणि 4 लाख रुपये लंपास केले. किनवट पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 नुसार गुन्हा क्रमांक 19/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक एम.बी.राठोड हे करीत आहेत.