नांदेड(प्रतिनिधी)-नरसी शहरातील एक सराफा दुकान फोडून चोरट्यांनी 39 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच नांदेड जिल्ह्या पोलीस दलाच्या अभिलेखावर मागील 24 तासात 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 8 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
चंद्रशेखर गोपाळराव पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 फेबु्रवारीच्या मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरट्यांनी नरसी शहरातील मुखेड रस्त्यावर असलेले त्यांचे सराफा दुकान फोडले. चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा 39 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
गेल्या 24 तासाच्या पोलीस अभिलेखाप्रमाणे पोलीस ठाणे विमानतळ, इतवारा, हदगाव ,लिंबगाव, लोहा, कुंटूर, शिवाजीनगर आणि नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 8 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणाचे 8 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास सुरू आहेत.