नांदेड(प्रतिनिधी)-पैसे देणे-घेण्याच्या कारणावरून एका 26 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना होनवडज ता.मुखेड येथे 2 फेबु्रवारीच्या दुपारी 4.30 वाजता घडली आहे.
मोहन रावण जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा शहाजी मोहन जाधव (26) यास ज्ञानेश्र्वर प्रभाकर जाधव (33) रा.होनवडज याने होनवडज गावात दुधडेअरी समोर 2 फेबु्रवारीच्या दुपारी 4.30 वाजता गाठले. पैसे देणे-घेणे या प्रकरणावरून वाद झाला आणि ज्ञानेश्र्वर जाधवने शहाजी जाधवच्या पोटात आणि मानेवर चाकूने वार केले. यात शहाजी जाधवचा मृत्यू झाला. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 30/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक व्ही.व्ही.गोबाडे हे करीत आहेत.
होनवडज तालुका मुखेड येथे 26 वर्षीय युवकाचा खून