कोरोना बातमी;गुरुवारी तीन मृत्यू;रुग्ण संख्या २०५; सुट्टी ३२० जणांना;अति गंभीर संख्या वाढत आहे

नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने दोन पुरुष आणि एक महिला अश्या तीन रुग्णांना मृत्यू दिला आहे. गुरुवारी कोरोना विषाणूने एकूण २०५ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २०६४ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९५.३५ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात १२.८५ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ५०.७३ टक्के रुग्ण आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी कोरोना बाधेने तीन रुग्णांनाचा मृत्यू झाला आहे.त्यात दोन पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे.आज २०५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.

कोरोना मुले सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे आबादीनगर ता. मुखेड पुरुष वय २२ आणि पालम जिल्हा परभणी येथील पुरुष वय ७८ तसेच खाजगी रुग्णालयात दर्यापूर जिल्हा अमरावती येथील महिला वय ८० अश्या तीन लोकानांचा मृत्यू कोरोना बाधेने झाला आहे.

नांदेड मनपा विलगिकरणातून-२१७, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०२, खाजगी रुग्णालय-२०, तालुक्यातील गृह विलगीकरण-८०,जिल्हा रुग्णालय कोवीड रुग्णालय-०१,अश्या ३२० रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९७३१५ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९५.३५ टक्के आहे.

आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-१०४, मुखेड-०६, नांदेड ग्रामीण-०४, किनवट-०७, कंधार- ०१,देगलूर-११,लोहा-०७,

नायगाव-०१,मुदखेड-०३, बिलोली-१०, बिलोली-०७,माहूर-२३, अर्धापूर-०३, धर्माबाद-०१,उमरी-०७, हदगाव-०४, अकोला-०१,

परभणी-०२,हिंगोली-०५, लातूर-०१,बुलढाणा-०२,बिहार-०२,

औरंगाबाद-०१, नागपूर-०१, तेलंगणा-०१, असे आहेत.

आज १५९५ अहवालांमध्ये १३०९ निगेटिव्ह आणि २०५ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०२०५६ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत १७६ आणि २९ अँटीजेन तपासणीत असे एकूण २०५ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ७६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०५ आहेत.

आज कोरोनाचे २०६४ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -११२१, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-८७२,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-२९, जिल्हा कोवीड रुग्णालय-०१,खाजगी रुग्णालयात- ३४, देगलूर-०७, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०८ रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *