नांदेड(प्रतिनिधी)-तुरूंगातून बाहेर आल्यानंतर पवन जगदीश बोराने वसुलीची एक मोहिम राबवतांना कॉल करणाऱ्याला वजिराबाद पोलीस ठाण्यात जावून माझी तक्रार देे असा सल्ला दिला. या शब्दांना समजून घेत आपल्या आई-बहिणीचा उध्दार ऐकणाऱ्या युवकाने पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड आणि पोलीस अधिक्षक नांदेड यांना या गुंडापासून संरक्षण मिळावे असा अर्ज आज दिला आहे.
नांदेडच्या वजिराबाद भागात राहुल श्रीश्रीमाळ नावाचा युवक राहतो. त्याने आपल्या वडीलांची बायपास सर्जरी करण्याच्यावेळेस वजिराबाद भागातील गडगंज श्रीमंत असलेल्या पवन जगदीश बोरा (शर्मा) कडून 1 लाख 80 हजार रुपये घेतले होते. कोरोनाच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात राहुल श्रीश्रीमाळ यांचीही नोकरी गेली. त्यामुळे ते आपल्यावर उपकार करणाऱ्या पवन जगदीश बोराचे पैसे देवू शकले नाहीत. मागील तीन-चार महिने आपल्या त्या प्रतापामुळे तुरूंगावासात असलेल्या सन्माननिय श्रीमंत पवन जगदीश बोराची मागे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने त्यांना जामीन मंजुर केला. तुरूंगवासातून आल्यानंतर वेगवेगळ्या रंगांचे पाणी घेत पवन बोराने आपला वसुलीचा धंदा पुन्हा सुरू केला. त्याने राहुल श्रीश्रीमाळ यास केलेल्या दुरध्वनीमध्ये पेमेंट या शब्दापासून तो दुरध्वनी कॉल सुरू होतो. पुढे ऐकणाऱ्या युवकाची आई-बहिण, पत्नी यांच्या सात जन्मांचा उध्दार करत त्यांना मुक्ती देत असंख्य शब्द त्या कॉलमध्ये आहेत. सोबतच पवन बोरा या युवकाला रेकॉर्डींग कर, वजिराबाद पोलीस ठाण्यात जावून मी शिवीगाळ करत आहे याची तक्रार कर असा सल्ला ओरडून ओरडून देत आहे. वजिराबादला जावून तक्रार देण्याचा सल्ला दिल्याने राहुल श्रीश्रीमाळने वजिराबाद पोलीस ठाण्यात जाण्याची हिंमत दाखवली नाही आणि त्याने पोलीस उपमहानिरिक्षक आणि पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात जावून पवन बोरा नावाचा गुुंड मला आणि माझ्या परिवाराला पैशासाठी जीवे मारण्याची धमकी देत आहे, मला त्याच्याकडून जीवीताचा धोका आहे असे या अर्जात लिहिल्यानंतर राहुल श्रीश्रीमाळने आपल्या आणि आपल्या कुटूंबासाठी संरक्षणाची मागणी केली आहे. नांदेडच्या वजिराबाद भागातील पवन बोरा नावाचा सावकार पैसे मागतांना त्या व्यक्तीच्या आई, बहिण आणि पत्नीचा ज्या पध्दतीने उध्दार करतो आहे त्यासाठी कांही कायदा अस्तित्वात आहे की, नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यात जावून माझी तक्रार कर-इतिश्री पवन बोरा