नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने दोन पुरुष रुग्णांना मृत्यू दिला आहे. रविवारी कोरोना विषाणूने एकूण १२७ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६३८ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९५.७८ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात ०७.९३ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ४८.८४ टक्के रुग्ण आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी कोरोना बाधेने दोन पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज १२७ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
कोरोना मुळे सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे पळसपूर ता. हिमायतनगर पुरुष वय ७५ आणि गंगाखेड जिल्हा परभणी येथील पुरुष वय ८२ अश्या दोन लोकांचा मृत्यू कोरोना बाधेने झाला आहे.
नांदेड मनपा विलगिकरणातून-१३६, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०५, खाजगी रुग्णालय-०५, तालुक्यातील गृह विलगीकरण-१४५,अश्या २९१ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८१५२ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९५.७८ टक्के आहे.
आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-६२, मुखेड-०८, नांदेड ग्रामीण-०२, किनवट-१३, कंधार- ०४,देगलूर-०३, पुणे-०१,लोहा-०१,नायगाव-०२,मु दखेड-०४, बिलोली-०९, धर्माबाद- ०१,हदगाव-०३,हिंगोली-०१, हिमा यतनगर-०३,भोकर-०३, परभणी-०५,औरं गाबाद-०१,तेलंगणा-०१, असे आहेत.
आज १६०१अहवालांमध्ये १४२४ निगेटिव्ह आणि १२७ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०२४७३ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत १०६ आणि २१ अँटीजेन तपासणीत असे एकूण १२७ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ४९ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०३ आहेत.
आज कोरोनाचे १६३८ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -८९९, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-६७४,सरकारी रुग्णालय -३०, खाजगी रुग्णालयात- ३२,देगलूर-०३, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०४ रुग्ण आहेत.