
नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सावली आणि सर्व समाजाची आई माता रमाई यांच्या जयंती निमित्त डॉ.आंबेडकर नगर येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून अन्नदान हा कार्यक्रम समाजातील सर्वात कमी वयाच्या मुलांनी पुढाकार घेवून केल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे.
या कार्यक्रमाला प्रा राजू सोनसळे, सत्यपाल सावंत,राहुल सोनसळे,अतिष ढगे,गब्बर सोनवणे, कपिल वावळे, अविनाश गायकवाड, शांताबाई धुताडे, सावंत माय, मायाताई नरवाडे, जोंधळे काकू, मथरूबाई कांबळे, सारीखाबाई कांबळे, पंचशीला कांबळे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कुलभूषण कांबळे, सौरभ खंदारे, प्रशिक कांबळे, अजय सोनकांबळे, प्रवीण जाधव, तुषार सरोदे, साई कांबळे, तेजस रोटे, साहिल आखरगेकर, रोहित कागडे, सतीश खंदारे, हर्षवर्धन कांबळे, शेखर कांबळे, चंद्रकांत कांबळे, संकेत सोनकांबळे,शुभम सोने,श्रीकांत सोनकांबळे,विश्वकांत एडके आदीनी केले.
