नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच नातलगावर जिव घेणा हल्ला करणाऱ्या 32 वर्षीय युवकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
रावसाहेब दत्तराव उबाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 फेबु्रवारीच्या रात्री 10.30 वाजता गाडेगाव ता.जि.नांदेड येथे महेश रावसाहेब उबाळे हा त्यांचा पुत्र घरी असतांना हनुमान गणेश उबाळे तेथे आला. त्याने महेश उबाळेला माझ्या बहिणीला तुझ्या चुलत्याला सांगून तु घरातून काढायला लावलास असा आरोप केला. यातून झालेल्याला वादात हनुमान गणेश उबाळेने महेश रावसाहेब उबाळेवर चाकुने हल्ला केला. त्यात महेश उबाळेच्या छातीवर, पोटावर, हातावर गंभीर जखमा झाल्या. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 71/2022 कलम 307, 504, भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
आज दि.9 फेब्रुवारी रोजी महेश रावसाहेब उबाळेवर जिवघेणा हल्ला करणारा हनुमान गणेश उबाळे (32) रा.गाडेगाव यास पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार शेख रब्बानी आणि गिते यांनी न्यायालयात हजर केले. तपासाच्या प्रगतीसाठी न्यायाधीश एम.बी.कुलकर्णी यांनी हनुमान गणेश उबाळेला 12फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.